....... आणि मी पाहिले की, पूजा, मनीष आणि राहुल तिकडे त्यापलीकडच्या गुंफेत पोहोचलेले पण होते.................
मी आणि गौरीश सुद्धा त्याच निमुळत्या वाटेवरून (traverse) चालू लागलो, कसे बसे हाताला लागणारे चटके खात मी त्या वाटेवरून तोल सावरत पुढे जात होतो......... मागून गौरीश पण होताच, मला जेव्हढी माझ्या जीवाची काळजी भीती वाटत होती ...... साहजिकच त्यालाही वाटणारच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त !!!
मी ठरवलेले काहीही झाले तरी fall घ्यायचा नाही...... आणि ते परवडणारे पण नव्हते ...... शेवटी एकदाचा मी त्या पलीकडे कसा बसा पार झालो ........ आणि ..... आणि गौरीश अजून मागेच होता, कदाचित त्याच्या सबंध आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असावा .... असो, तोही तोल सावरत सावरत माझ्या मागून पलीकडे आला आणि आम्हा दोघांनाही खूप बरे वाटले की................ जीव वाचला !!! हा हा हा
मग आम्ही त्या पलीकडल्या गुंफेत विराजमान झालो जिथे अगोदरच मनीष, पूजा आणि राहुल विसावले होते. दुपारचा एक वाजला असावा काही वेळाने तिथली नाहक आणि व्यर्थ अशी वाटणारी गर्दी नाहीशी झाली होती. समोर निळे आकाश आणि खाली गर्द झाडी, झुडुपे ........ लांब दिसणारी इवली इवलीशी घरे ..... आणि मनाला गार करणारा थंड हवेच झोत , डाव्या बाजूला राजमाची गडावरील काहीसा अस्पष्ट असा दिसणारा भाग दिसून येत होता ...... मन कसे प्रसन्न वाटत होते ....... एव्हढा वेळ शरीराला जाणवणारा शीण, थकवा जणू पार दूर उडून गेला होता.
आम्हाला काहीवेळ विश्रांती घेण्यास सांगून राहुल आणि मनीष हे दोघे जण परत त्याच वाटेने वरील गुंफेकडे निघाले तेथे पाण्याचा साठा मुबलक आहे असे आम्ही अगोदरच ऐकून होतो, त्याप्रमाणे ते दोघेही रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन निघाले...........
Thursday, December 30, 2010
Wednesday, December 29, 2010
ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--४
शेवटी एकदाचे त्या गुंफेच्या जवळ पोहोचलो ......... जराशी गर्दी होतीच.
आमच्या अगोदर बरीचशी मंडळी तिथे पोहोचली होती. त्या अरुंद अशा वाटेवर खूप गिर्यारोहक ताटकळत, उन्हाचे चटके खात उभे होते....... खडक फार तापला होता, हाताला ते प्रकर्षाने जाणवत होते ....... पण काय करणार? ......... नाईलाज होता....... आहे त्या स्थिती मध्ये आम्हाला थांबणे भाग च होते. आमचे लक्ष्य तिथे असलेल्या एका फलकावर गेले की, गुहेमध्ये महिलांना प्रवेश नाही .......... म्हणजे जवळ जवळ प्रतिबंधच ..... आम्हाला हे वाचून खूप वाईट वाटले विशेषतः पूजा ला, बहुधा तिच्या मनात आले असावे की, " एव्हढी पायपीट आणि दमछाक उडवत, जीव अक्षरशः मुठीत ठेऊन एव्हढी कठीण चढण चढायचे आणि वर आल्यावर पाहते काय तर प्रतिबंध !!!" ............. बिचारी पूजा पण नाईलाज होता...........!!!
तेव्हा मनीष आणि राहुल ने पूजा समवेत तिथून थोडया दूर अंतरावर असलेल्या गुंफेत थोडा वेळ आसरा घ्यायचे ठरवले. तिथे जाणार वाट तशी अरुंद च होती (वाट पण नाही म्हण शकत), traverse चा प्रकार होता तो ......... जणू एक उभी भिंत उभी राहून राहून दमली असावी आणि जराशी पाठीमागे आराम करण्यासाठी कलंडली असल्याचा भास होत होता (माझ्या मनात उगाचंच कल्पनाविष्कार सुरु होते)........... तर ती वाट अगदी निमुळती होती जेमतेम पाय ठेवण्यास जागा होती, ते पण अर्धवट पाय ........पूर्ण नाही (जवळ जवळ आपल्या पंज्यावर तोल होता) !!! ......... मध्ये मध्ये हात पकडण्यास थोडीशी जागा (grip) होतीच व लोखंडी कड्या (bolts) पण होते आधारासाठी ........ तरी सुद्धा थोडीशी धाक धुक मनात जाणवत होतीच ....... छाती अशी धडधडून येत होती कारण, जरासा पाय सरकला ... किंवा जरासा तोल गेला तरी खाली खोल दरी होती .......... आणि मला माझ्या डोळ्या समोर काही पर्याय दिसू लागले, १. सरळ ढगात, २. सरळ हॉस्पिटल मध्ये, आणि ३. हाडांचा खूळखुळा .......... अरे बापरे मी स्वतःला सावरले (मला माझ्या स्वप्नाविष्कारांतून बाहेर पडायला थोडा वेळ लागला)....... नंतर स्वतःशीच बोललो एव्हढे काही कठीण नाही ते ...... आपण आरामशीर करू ....... आणि मी पाहिले की, पूजा, मनीष आणि राहुल तिकडे त्यापलीकडच्या गुंफेत पोहोचलेले पण होते.................

Tuesday, December 28, 2010
ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--३
...............असे करत करत आम्ही एकदाचे बहिरी गुफांच्या खालील सपाट मैदानावर पोचलो.
त्या सपाट मैदानावर एक मंदिर सदृश्य जागा होती ........ बघून मन जरा प्रसन्न झाले आणि दोन्ही हात आपसूकच जोडले गेले.
जेव्हा नजर वर केली तेव्हा अक्षरशः डोळ्या समोर दिसत होती ती उभी चढण ...... पण थांबून काहीच फायदा नव्हता कारण ऊन वाढत होते व आम्हाला लवकरात लवकर गुंफेपर्यंत पोचायचे होते.
गौरीश जरासा थकला होता म्हणून त्याने विशेष मागणी केलेली जड सामानाची बैग माझ्या खांद्यावर घेतली व पुढची वाटचाल चालू केली ........
चढण खरेच दमछाक उडवणारी होती, आणि आम्ही दमत, थांबत आणि अक्षरशः धापा टाकत चढत होतो ......... ह्यामध्ये विशेष करून मानले पाहिजे ते पूजा ला आमच्या बरोबरीने तीही अगदी व्यवस्थित चढत होती व मनीष आणि राहुल तिला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळत नेत होते ........!!!
काही भाग तर अगदी free climb होता, सर्व holds व्यवस्थित पकडून आणि पायाची grip घेत आम्ही स्वतःचा तोल सावरत वर वर जात होतो. काही क्षण असे होते की, अगदी जीव मुठीत घेतल्या सारखा वाटत होता तरीही ती मस्ती काही औरच होती ........ अशामध्ये माझी मनीष कडे नजर गेली ..... एकदम विलक्षण शांतपणे आणि जराशी ही चूक होऊ न देता तो व्यवस्थित पद्धतशीरपणे वर चढत होता. त्याला प्रेरित होऊन मीही गौरीश बरोबर सावधानता बाळगून त्याच्या मागोमाग चढत होतो. शेवटी एकदाचे त्या गुंफेच्या जवळ पोहोचलो ......... जराशी गर्दी होतीच .

ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--2
आम्ही ती ट्रेन पकडून कर्जत साठी निघालो..........
आम्ही कर्जत ला उतरलो आणि थोडीफार खरेदी केली जसे की, मैगी, सॉस, ब्रेड, वर्तमानपत्र ........ पण वाचण्यास नव्हे (खाली अंथरायला ....... तुम्ही काय समजलात?) अश्या प्रकारे आम्ही खरेदी करत करत बस स्थानकावर पोचलो, आम्हाला सांडशी गावात जायचे होते ..... पण बस निघून गेली होती व आम्हाला एक तास वाट बघावी लागणार होती किंवा रिक्षा करणे भाग होते .......... आंम्ही एक तास फुकट घालवण्यापेक्षा रिक्षा ने जाणे पसंत केले आणि आम्ही रिक्षा ने निघालो .......... रिक्षामध्ये पण आमची थट्टा मस्करी चालू होती, त्याशिवाय जीवन अधुरे आहे ....... आयुष्यात थोडी थट्टा.... थोडी मस्ती ........ थोडी मस्करी आणि थोडासा समजूतदारपणा हवाच ................. ह्या सर्वां शिवाय आयुष्याची चव अळणी च लागेल........!!! असो, ........... आम्ही सांडशी गावात उतरलो आणि थोडी थोडी चहा प्यायलो...... गावची चुलीवरच्या चहाची चव निराळीच असते (म्हणजे छान असते ). आम्ही तिथे एका कैलास नावाच्या गाईड ला बरोबर घेऊन ढाक-बहिरी साठी निघालो.
कैलास हा अकरावीत शिकणारा मुलगा होता. तर....... आमच्या अगोदर बदलापूरची काही मुले आली होती, कैलास आम्हाला व त्यांना बरोबर घेऊन शेताच्या वाटेतून निघाला ............ शेतातील वाट तुडवत, नागमोडी वळणे घेत आम्हीही त्याच्या मागून रमत गमत निघालो.... बरोबर असणारी मुले टवाळ होती त्यांची आपापसात मस्ती चालू होती किंबहुना ती मुले सुट्टी आणि मस्ती ह्याच मूड मध्ये आली होती, असो.......... अश्याच रम्य वातावरणाचा आनंद घेत घेत ढाक ची चढण सुरु झाली होती.
चढण तशी सोप्पी नव्हती पण आम्ही रोजच्या (म्हणजेच साप्ताहिक) सवयीनुसार चढत होतो ...... एकमेकांना सावरत, थोडे चढत थोडे थांबत आम्ही कैलास च्या नेतृत्वाखाली एकामागून एक असे निघालो होतो .......
गौरीश ने मला थोडे जास्त वजन पाहिजे अशी मागणी केली होती ........... अश्या मागणीची पूर्तता आम्ही लागलीच पुरी केली आणि त्याची बाग आम्ही काठोकाठ भरून टाकली ....... बिच्चारा गौरीश ...!!! मला त्याचे खूप कौतुक करावेसे वाटते की, त्याने असे बोलण्याचे धाडस केले आणि तेय धाडस पेलवताना त्याच्या नाकी... नऊ..... दहा .......... अकरा आणि विशेषतः ......बारा नक्कीच वाजले असतील !!!

असो............... असे करत करत आम्ही एकदाचे बहिरी गुफांच्या खालील सपाट मैदानावर पोचलो ..........
Monday, December 27, 2010
ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--१
नमस्कार गिर्यारोहक मित्रहो,
२४ डिसेंबर शुक्रवारचा दिवस होता आज ट्रेक साठी निघायचे होते मी सर्व तयारीनिशी निघालो व रेलवे स्थानका जवळ कूच केले आणि वडाळा स्थानकावर पोचलो तिकीट काढून ट्रेन पकडली ......... मनात खूप असे विचार चालू होते...... जसे की, ढाक-बहिरी बद्दल खूप ऐकून होतो की....... खूप कठीण चढण आहे, खूप कस लागतो वगैरे वगैरे .......... पण घाबरून जाईल तो दिनेश कसला? (हे मोठेपणाचे वाक्य नव्हे सत्य परिस्थिती आहे) ट्रेन च्या गती पेक्षा मनाच्या विचारांची गती जरा जास्तच होती.
रात्रीचे अकरा वाजले असावेत ......... मी बोरीवली ला पोहोचलो तिथे पादचारी पुलावर मी पूजा सागवेकर ला भेटलो, पूजा आमच्या बरोबर ट्रेक ला येणार होती तिला आणि गौरीश वधावकर ला घेऊन मी, मनीष आणि राहुल ट्रेक ला जाणार होतो, अजून गौरीश आला नव्हता. साधारण ११:२० च्या दरम्यान गौरीश चा फोन मला आला व आम्ही बोरीवली (पू.) च्या बस स्थानकावर भेटलो. थोडा वेळ थांबल्या नंतर आम्हाला ठाण्या ला जाण्यासाठी एस. टी. बस मिळाली. बस मध्ये बसल्या बसल्या नेहेमीप्रमाणे माझा गाण्यांचा कार्यक्रम चालू झाला, कदाचित पूजा ला मराठी गाण्यात रस नसावा म्हणून तिने डुलक्या काढणे पसंत केले .............. पण गौरीश माझ्या मैफिली मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत होता ......... काही विशेष आचार व विचारांची देवान घेवाण पण झाली, पण ती मस्करी पुरतीच !!! नंतर त्याला पण झोप अनावर झाली आणि तोही निद्रादेवीच्या चरणी स्वतःला अर्पण करीत डुलक्या काढू लागला ..........!!!
जेव्हा ठाणे बस स्थानक जवळ आले तेव्हा त्यांची निद्रा भंग करण्यात कंडक्टर पुरता यशस्वी झाला होता....... आणि आम्ही ठाण्याला उतरून तिथून मुलुंड साठी रिक्षा केली......... तीथुन राहुलच्या घरी आम्ही पोचलो तीथे अगोदरच मनीष हजर होता. आणि राहुल ने मस्त क्रिसमस केक आणून ठेवला होता............
आम्ही त्या केक वर मस्तपैकी ताव मारून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो............. राहुल ने झोपण्या पूर्वी त्याचा टाईम बॉम्ब सेट केलेला होता (घडयाळाचा गजर).
सकाळी ०४:३० चा गजर वाजताच सर्वजण उठले ........ सर्व प्रातः विधी आटपून आम्ही राहुलने बनवलेला चहा पिऊन मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ निघालो ....... जरासा उशीर च झाला होता निघे निघे पर्यंत, जरासे धावत पळतच आम्ही मुलुंड स्थानकावर पोचलो पण ०५:३१ ची अपेक्षित ट्रेन निघून गेली होती ............ पण त्यानंतर ०६.१० ची कर्जत ला जाणारी ट्रेन होतीच ......... आम्ही स्थानकावर थोडीशी थट्टा मस्करी करत वेळ घालवत होतो. ट्रेन अपेक्षेनुसार १० मिनिटे उशिराच आली ......... आम्ही ती ट्रेन पकडून कर्जत साठी निघालो.

Subscribe to:
Posts (Atom)