Tuesday, December 28, 2010

ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--2

आम्ही ती ट्रेन पकडून कर्जत साठी निघालो..........
                      आम्ही कर्जत ला उतरलो आणि थोडीफार खरेदी केली जसे की, मैगी, सॉस, ब्रेड,  वर्तमानपत्र ........ पण वाचण्यास नव्हे (खाली अंथरायला ....... तुम्ही काय समजलात?) अश्या प्रकारे आम्ही खरेदी करत करत बस स्थानकावर पोचलो, आम्हाला सांडशी गावात जायचे होते ..... पण बस निघून गेली होती व आम्हाला एक तास वाट बघावी लागणार होती किंवा रिक्षा करणे भाग होते .......... आंम्ही एक तास फुकट घालवण्यापेक्षा रिक्षा ने जाणे पसंत केले आणि आम्ही रिक्षा ने निघालो .......... रिक्षामध्ये पण आमची थट्टा मस्करी चालू होती, त्याशिवाय जीवन अधुरे आहे ....... आयुष्यात थोडी थट्टा.... थोडी मस्ती ........ थोडी मस्करी आणि थोडासा समजूतदारपणा हवाच ................. ह्या सर्वां शिवाय आयुष्याची चव अळणी च लागेल........!!! असो, ........... आम्ही सांडशी गावात उतरलो आणि थोडी थोडी चहा प्यायलो...... गावची चुलीवरच्या चहाची चव निराळीच असते (म्हणजे छान असते ). आम्ही तिथे एका कैलास नावाच्या गाईड ला बरोबर घेऊन ढाक-बहिरी साठी निघालो.
                  कैलास हा अकरावीत शिकणारा मुलगा होता. तर....... आमच्या अगोदर बदलापूरची काही मुले आली होती, कैलास आम्हाला व त्यांना बरोबर घेऊन शेताच्या वाटेतून निघाला ............ शेतातील वाट तुडवत, नागमोडी वळणे घेत आम्हीही त्याच्या मागून रमत गमत  निघालो.... बरोबर असणारी मुले टवाळ होती त्यांची आपापसात मस्ती चालू होती किंबहुना ती मुले सुट्टी आणि मस्ती ह्याच मूड मध्ये आली होती, असो.......... अश्याच रम्य वातावरणाचा आनंद घेत घेत ढाक ची चढण सुरु झाली होती.
चढण तशी सोप्पी नव्हती पण आम्ही रोजच्या (म्हणजेच साप्ताहिक) सवयीनुसार चढत होतो ...... एकमेकांना सावरत, थोडे चढत थोडे थांबत आम्ही कैलास च्या नेतृत्वाखाली एकामागून एक असे निघालो होतो .......

गौरीश ने मला थोडे जास्त वजन पाहिजे अशी मागणी केली होती ........... अश्या मागणीची पूर्तता आम्ही लागलीच पुरी केली आणि त्याची बाग आम्ही काठोकाठ भरून टाकली ....... बिच्चारा गौरीश ...!!! मला त्याचे खूप कौतुक करावेसे वाटते की, त्याने असे बोलण्याचे धाडस केले आणि तेय धाडस पेलवताना त्याच्या नाकी... नऊ..... दहा .......... अकरा आणि विशेषतः ......बारा नक्कीच वाजले असतील !!!

असो............... असे करत करत आम्ही एकदाचे बहिरी गुफांच्या खालील सपाट मैदानावर पोचलो ..........
 

No comments:

Post a Comment