...............असे करत करत आम्ही एकदाचे बहिरी गुफांच्या खालील सपाट मैदानावर पोचलो.
त्या सपाट मैदानावर एक मंदिर सदृश्य जागा होती ........ बघून मन जरा प्रसन्न झाले आणि दोन्ही हात आपसूकच जोडले गेले.
जेव्हा नजर वर केली तेव्हा अक्षरशः डोळ्या समोर दिसत होती ती उभी चढण ...... पण थांबून काहीच फायदा नव्हता कारण ऊन वाढत होते व आम्हाला लवकरात लवकर गुंफेपर्यंत पोचायचे होते.
गौरीश जरासा थकला होता म्हणून त्याने विशेष मागणी केलेली जड सामानाची बैग माझ्या खांद्यावर घेतली व पुढची वाटचाल चालू केली ........
चढण खरेच दमछाक उडवणारी होती, आणि आम्ही दमत, थांबत आणि अक्षरशः धापा टाकत चढत होतो ......... ह्यामध्ये विशेष करून मानले पाहिजे ते पूजा ला आमच्या बरोबरीने तीही अगदी व्यवस्थित चढत होती व मनीष आणि राहुल तिला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळत नेत होते ........!!!
काही भाग तर अगदी free climb होता, सर्व holds व्यवस्थित पकडून आणि पायाची grip घेत आम्ही स्वतःचा तोल सावरत वर वर जात होतो. काही क्षण असे होते की, अगदी जीव मुठीत घेतल्या सारखा वाटत होता तरीही ती मस्ती काही औरच होती ........ अशामध्ये माझी मनीष कडे नजर गेली ..... एकदम विलक्षण शांतपणे आणि जराशी ही चूक होऊ न देता तो व्यवस्थित पद्धतशीरपणे वर चढत होता. त्याला प्रेरित होऊन मीही गौरीश बरोबर सावधानता बाळगून त्याच्या मागोमाग चढत होतो. शेवटी एकदाचे त्या गुंफेच्या जवळ पोहोचलो ......... जराशी गर्दी होतीच .



nice..keep it up mitra!
ReplyDeletethnxx dude :)
ReplyDeleteHmm exiciting..... Mala ter ithuncha bhiti vatatey.... itka thrilling ..[:)]
ReplyDelete