Thursday, December 30, 2010

ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--५

....... आणि मी पाहिले की, पूजा, मनीष आणि राहुल तिकडे त्यापलीकडच्या गुंफेत पोहोचलेले पण होते.................
                                    मी आणि गौरीश सुद्धा त्याच निमुळत्या वाटेवरून (traverse) चालू लागलो, कसे बसे हाताला लागणारे चटके खात मी त्या वाटेवरून तोल सावरत पुढे जात होतो......... मागून गौरीश पण होताच, मला जेव्हढी माझ्या जीवाची काळजी भीती वाटत होती ...... साहजिकच त्यालाही वाटणारच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त !!!


मी ठरवलेले काहीही झाले तरी fall घ्यायचा नाही...... आणि ते परवडणारे पण नव्हते ...... शेवटी एकदाचा मी त्या पलीकडे कसा बसा पार झालो ........ आणि ..... आणि गौरीश अजून मागेच होता, कदाचित त्याच्या सबंध आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असावा .... असो, तोही तोल सावरत सावरत माझ्या मागून पलीकडे आला आणि आम्हा दोघांनाही खूप बरे वाटले की................ जीव वाचला !!! हा हा हा
                  मग आम्ही त्या पलीकडल्या गुंफेत विराजमान झालो जिथे अगोदरच मनीष, पूजा आणि राहुल विसावले होते. दुपारचा एक वाजला असावा काही वेळाने तिथली नाहक आणि व्यर्थ अशी वाटणारी गर्दी नाहीशी झाली होती. समोर निळे आकाश आणि खाली गर्द झाडी, झुडुपे ........ लांब दिसणारी इवली इवलीशी घरे ..... आणि मनाला गार करणारा थंड हवेच झोत , डाव्या बाजूला राजमाची गडावरील काहीसा अस्पष्ट असा दिसणारा भाग दिसून येत होता ...... मन कसे प्रसन्न वाटत होते ....... एव्हढा वेळ शरीराला जाणवणारा शीण, थकवा जणू पार दूर उडून गेला होता.
 आम्हाला काहीवेळ विश्रांती घेण्यास सांगून राहुल आणि मनीष हे दोघे जण परत त्याच वाटेने वरील गुंफेकडे निघाले तेथे पाण्याचा साठा मुबलक आहे असे आम्ही अगोदरच ऐकून होतो, त्याप्रमाणे ते दोघेही रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन निघाले...........

No comments:

Post a Comment