Wednesday, December 29, 2010

ढाक-बहिरी एक अविस्मरणीय ट्रेक भाग--४

शेवटी एकदाचे त्या गुंफेच्या जवळ पोहोचलो ......... जराशी गर्दी होतीच.
                            आमच्या अगोदर बरीचशी मंडळी तिथे पोहोचली होती. त्या अरुंद अशा वाटेवर खूप गिर्यारोहक ताटकळत, उन्हाचे चटके खात उभे होते....... खडक फार तापला होता, हाताला ते प्रकर्षाने जाणवत होते ....... पण काय करणार? ......... नाईलाज होता....... आहे त्या स्थिती मध्ये आम्हाला थांबणे भाग च होते. आमचे लक्ष्य तिथे असलेल्या एका फलकावर गेले की, गुहेमध्ये महिलांना प्रवेश नाही .......... म्हणजे जवळ जवळ प्रतिबंधच ..... आम्हाला हे वाचून खूप वाईट वाटले विशेषतः पूजा ला, बहुधा तिच्या मनात आले असावे की, " एव्हढी पायपीट आणि दमछाक उडवत, जीव अक्षरशः मुठीत ठेऊन एव्हढी कठीण चढण चढायचे आणि वर आल्यावर पाहते काय तर प्रतिबंध !!!" ............. बिचारी पूजा पण नाईलाज होता...........!!!
                                           तेव्हा मनीष आणि राहुल ने पूजा समवेत तिथून थोडया दूर अंतरावर असलेल्या गुंफेत थोडा वेळ आसरा घ्यायचे ठरवले. तिथे जाणार वाट तशी अरुंद च होती (वाट पण नाही म्हण शकत), traverse चा प्रकार होता तो ......... जणू एक उभी भिंत उभी राहून राहून दमली असावी आणि जराशी पाठीमागे आराम करण्यासाठी कलंडली असल्याचा भास होत होता (माझ्या मनात उगाचंच  कल्पनाविष्कार सुरु होते)........... तर ती वाट अगदी निमुळती होती जेमतेम पाय ठेवण्यास जागा होती, ते पण अर्धवट पाय ........पूर्ण नाही (जवळ जवळ आपल्या पंज्यावर तोल होता) !!! ......... मध्ये मध्ये हात पकडण्यास थोडीशी जागा (grip) होतीच व लोखंडी कड्या (bolts) पण होते आधारासाठी ........ तरी सुद्धा थोडीशी धाक धुक मनात जाणवत होतीच ....... छाती अशी धडधडून येत होती कारण, जरासा पाय सरकला ... किंवा जरासा तोल गेला तरी खाली खोल दरी होती .......... आणि मला माझ्या डोळ्या समोर काही पर्याय दिसू लागले, १. सरळ ढगात, २. सरळ हॉस्पिटल मध्ये, आणि ३. हाडांचा खूळखुळा .......... अरे बापरे मी स्वतःला सावरले (मला माझ्या स्वप्नाविष्कारांतून बाहेर पडायला थोडा वेळ लागला)....... नंतर स्वतःशीच बोललो एव्हढे काही कठीण नाही ते ...... आपण आरामशीर करू ....... आणि मी पाहिले की, पूजा, मनीष आणि राहुल तिकडे त्यापलीकडच्या गुंफेत पोहोचलेले पण होते.................

No comments:

Post a Comment