नमस्कार गिर्यारोहक मित्रहो,
२४ डिसेंबर शुक्रवारचा दिवस होता आज ट्रेक साठी निघायचे होते मी सर्व तयारीनिशी निघालो व रेलवे स्थानका जवळ कूच केले आणि वडाळा स्थानकावर पोचलो तिकीट काढून ट्रेन पकडली ......... मनात खूप असे विचार चालू होते...... जसे की, ढाक-बहिरी बद्दल खूप ऐकून होतो की....... खूप कठीण चढण आहे, खूप कस लागतो वगैरे वगैरे .......... पण घाबरून जाईल तो दिनेश कसला? (हे मोठेपणाचे वाक्य नव्हे सत्य परिस्थिती आहे) ट्रेन च्या गती पेक्षा मनाच्या विचारांची गती जरा जास्तच होती.
रात्रीचे अकरा वाजले असावेत ......... मी बोरीवली ला पोहोचलो तिथे पादचारी पुलावर मी पूजा सागवेकर ला भेटलो, पूजा आमच्या बरोबर ट्रेक ला येणार होती तिला आणि गौरीश वधावकर ला घेऊन मी, मनीष आणि राहुल ट्रेक ला जाणार होतो, अजून गौरीश आला नव्हता. साधारण ११:२० च्या दरम्यान गौरीश चा फोन मला आला व आम्ही बोरीवली (पू.) च्या बस स्थानकावर भेटलो. थोडा वेळ थांबल्या नंतर आम्हाला ठाण्या ला जाण्यासाठी एस. टी. बस मिळाली. बस मध्ये बसल्या बसल्या नेहेमीप्रमाणे माझा गाण्यांचा कार्यक्रम चालू झाला, कदाचित पूजा ला मराठी गाण्यात रस नसावा म्हणून तिने डुलक्या काढणे पसंत केले .............. पण गौरीश माझ्या मैफिली मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत होता ......... काही विशेष आचार व विचारांची देवान घेवाण पण झाली, पण ती मस्करी पुरतीच !!! नंतर त्याला पण झोप अनावर झाली आणि तोही निद्रादेवीच्या चरणी स्वतःला अर्पण करीत डुलक्या काढू लागला ..........!!!
जेव्हा ठाणे बस स्थानक जवळ आले तेव्हा त्यांची निद्रा भंग करण्यात कंडक्टर पुरता यशस्वी झाला होता....... आणि आम्ही ठाण्याला उतरून तिथून मुलुंड साठी रिक्षा केली......... तीथुन राहुलच्या घरी आम्ही पोचलो तीथे अगोदरच मनीष हजर होता. आणि राहुल ने मस्त क्रिसमस केक आणून ठेवला होता............
आम्ही त्या केक वर मस्तपैकी ताव मारून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो............. राहुल ने झोपण्या पूर्वी त्याचा टाईम बॉम्ब सेट केलेला होता (घडयाळाचा गजर).
सकाळी ०४:३० चा गजर वाजताच सर्वजण उठले ........ सर्व प्रातः विधी आटपून आम्ही राहुलने बनवलेला चहा पिऊन मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ निघालो ....... जरासा उशीर च झाला होता निघे निघे पर्यंत, जरासे धावत पळतच आम्ही मुलुंड स्थानकावर पोचलो पण ०५:३१ ची अपेक्षित ट्रेन निघून गेली होती ............ पण त्यानंतर ०६.१० ची कर्जत ला जाणारी ट्रेन होतीच ......... आम्ही स्थानकावर थोडीशी थट्टा मस्करी करत वेळ घालवत होतो. ट्रेन अपेक्षेनुसार १० मिनिटे उशिराच आली ......... आम्ही ती ट्रेन पकडून कर्जत साठी निघालो.


hmm chan chan....
ReplyDeletecontinue....mala ajun titla pict ani explanation wachaycha aahe...
da ..jastit jast pict tak...plz
thnxx Mansha,
ReplyDeletelikhaan chaalu aahe
waah mast aahe next kadhi??
ReplyDeletegood work bro!
ReplyDeleteliked it.
sweet nd short nd simple.
very well described
Chaan....waiting for more :)
ReplyDeleteKARJAT pasun pudhe kadhi janar.....
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteवाह.........!!!!
ReplyDeleteखरच खुपच छान ........!!!
आपण आपल्या प्रवासाचे अनुभव खूप छान मांडलेत....वाचताना आपण तिथेच कुठेतरी आहोत असे भास होतात......!!!!!
असेच लिहित राहा.........आणि आमच्या पिकनिकचा खर्च वाचवा.......!!!!!